Farmer Agitation in Lohara
sakal
लोहारा (जि. धाराशिव) - हातात करपलेले सोयाबीनचे पीक... डोळ्यांत पावसाची आस आणि सरकारकडून मदतीची अपेक्षा घेऊन लोहारा तालुक्यातील हजारो शेतकरी सोमवारी (ता. २१) रस्त्यावर उतरले. लोहारा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.