Parbhani Farmers: परभणी तालुक्यात अधिकाऱ्यांना माघारी पाठविले
Land Survey Protest : शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. शेतकऱ्यांनी लेखी पंचनामा करून तो शासनाकडे पाठविण्याची मागणी केली आहे.
परभणी : शक्तिपीठ महामार्गासाठी शुक्रवारी (ता.चार) जमीन मोजायला आलेल्या अधिकाऱ्यांना परभणी तालुक्यातील पिंगळी व शेंद्रा येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यांनी अधिकाऱ्यांना परत पाठविले.