शेतकरी संघटनांनी वाटले बीडमध्ये कांदे

जालिंदर धांडे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

बीड : सध्या जिल्ह्यात तीव्र दुष्काळात शेतकरी होरपळत असताना, कमी प्रमाणात आलेल्या पिकांना भाव मिळत नसल्याने विविध संघटनांनकडून सोमवारी (ता. 10) जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर मोफत कांदे वापट करन या धोरणाचा निषेध केला. 

कांदे मोफत वाटण्यात येत असले तरी काही संवेदनशील ग्राहकांनी दिलेल्या रकमेतून 140 रुपये जमले. ही रक्कम मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. खरीप - रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे. त्यातच आता पशुधनासाठी पाणी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजीपाला उत्पादक शेतकरी भाव नसल्याने अडचणीत आले आहेत. सरकारने कांदा आयात केल्याने कांद्याचे दर पडले आहेत. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना, सिपीएम, सुराज्य सेना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत कांदे वाटले. यातून जमलेले 140 रूपये मुख्यमंत्र्यांना पाठविणार असल्याचे आंदोलक स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, सिपीएमचे मोहन जाधव, सुराज्य सेनेचे वाचीष्ट बडे यांनी सांगितले.

Web Title: farmers organisation distributes onion