
घनसावंगी : अंबड व घनसावंगी तालुक्यात साखर कारखानदारीचे क्षेत्र जास्त असतानाही त्यांच्याकडून यंदा ऊस बागायतदार शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून २५०० रुपये दिला आहे. मात्र, दुसरीकडे तालुक्यात असलेल्या गूळ उद्योगाने एकरकमी बाजारात वाढलेल्या भावानुसार एकरकमी २७०० रुपये टनाला भाव दिल्याने साखरेपेक्षा गुळाची गोडी कायम असल्याचे चित्र आहे.