

The Battle for Justice: Farmers Protest Against Crop Loss Due to Jayakwadi Dam Backwater
Sakal
कायगाव : जायकवाडी धरणाच्या फुगवट्यामुळे गंगापूर तालुक्यातील अंमळनेर व लखमापूर परिसरातील शेतजमिनीचे गेल्या वीस वर्षांपासून नुकसान होत असून भरपाई व संपादनाची मागणी करूनही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१८) गोदावरी पात्रात नऊ तास जलसमाधी आंदोलन केले. प्रशासनाकडून त्याची कोणतीही दखल न घेतल्याने त्याचे रूपांतर बेमुदत उपोषणात झाले होते. मात्र बुधवारी (ता.२०) महसूल प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.