
छत्रपती संभाजीनगर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोधासाठी कृषीदिनी मंगळवारी (ता. एक) मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून जमीन मोजणीला विरोध करण्यात आला. घोषणा देत हा मार्ग रद्द करण्याची मागणी झाली. काही ठिकाणी पथकांना परतवून लावले. शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करून प्रशासनाला निवेदने दिली.