esakal | शेतकरी उपयोगी फळबागेसाठी महिला सरसावल्या... भोगावदेवी पर्यटनस्थळाचे बददले रुपडे 
sakal

बोलून बातमी शोधा

bhogav.

जिंतूर तालुक्यातील भोगाव येथील देवीसाहेब संस्थानच्या परिसरातील भोगावदेवी पर्यटनस्थळी मंगळवारी (ता.आठ) अवघ्या तीन तासात वेगवेगळ्या प्रकारच्या तीनशे फळझाडांची लागवड केली. 

शेतकरी उपयोगी फळबागेसाठी महिला सरसावल्या... भोगावदेवी पर्यटनस्थळाचे बददले रुपडे 

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर ः तालुक्यातील भोगाव येथील देवीसाहेब संस्थानच्या परिसरातील भोगावदेवी पर्यटनस्थळी मंगळवारी (ता.आठ) अवघ्या तीन तासात वेगवेगळ्या प्रकारच्या तीनशे फळझाडांची लागवड केली. 

मागील दोन वर्षापासून देवीसाहेब संस्थानच्या सत्तर एकर क्षेत्र जमिनीवर महाराष्ट्रातील पहिली शेतकरी उपयोगी फळबाग उभारली जात आहे. मंगळवार हा देवीचा वार असल्याने भोगावमधील आनंदी, सिद्धिविनायक, तुळजाभवानी, नारायणी, धनश्री या महिला बचतगटाच्या अनुसया देशमुख, अलका देशमुख, सोनाली देशमुख, वर्षा पुंड, शीतल देशमुख, उज्वला देशमुख, नंदा देशमुख, सुशीला देशमुख, शीला देशमुख, आरती देशमुख, तेजस्विनी देशमुख, तिरुमला देशमुख यांच्यासह सर्व सदस्यांनी सहभागी होऊन रितेश देशमुख व अवधूत देशमुख यांच्या मदतीने चिंच, जांभूळ, कवठ, आवळा, लिंब या फळझाडाची लागवड केली. 

हेही वाचा - नीट परीक्षेतील विद्यार्थी, पालकांच्या सोईसाठी रविवारी लॉकडाउनमध्ये मुभा

लोकसहभागातून भोगावदेवी पर्यटनस्थळाचे काम 
आई जगदंबेच्या परिसराला हिरवागार शालू नेसवावा व श्रमदानातून झाडे लावत हिरवा चुडा आईस भरावा, असा मानस महिलांनी व्यक्त केला. यानंतर सर्व महिलांनी वृक्षाखाली बच्चे कंपनीसह वनभोजनाचा आनंद घेतला. येथे जिल्ह्यासह इतर अनेक जिल्ह्यातून जगदंबेच्या दर्शनासाठी भाविक येतात. त्यांना शेतीविषयक बागेचा उपयोग व्हावा म्हणून लोकसहभागातून भोगावदेवी पर्यटनस्थळाचे काम करण्यात येत आहे. 

हेही वाचा - नांदेड : शहरात घाणीचे साम्राज्य, महापालिकेचे दुर्लक्ष

तीन हजार झाडे लावण्यात आली
तालुक्याबाहेरील तरूणवर्ग प्रत्येक रविवारी येथे भेट देऊन स्वहस्ते झाडे लावतो. सध्या पर्यटनस्थळावर दहा हजार फळझाडांची लागवड सुरू असून अद्यापपर्यंत तीन हजार झाडे लावण्यात आली. विशेषतः दीर्घकाळ टिकणाऱ्या देशी फळझाडांचीच लागवड केली जाते. त्यासाठी परिसरासह बाहेरच्या जिल्ह्यातील वृक्षप्रेमींची मदत आहे. झाडे लावाण्यासाठी खड्डे खोदणे, पाण्यासाठी पाईप लाईन, ठिबक संच, तारांचे कुंपण यासाठी संस्थान आणि विविध क्षेत्रातील दाते मदतीचा हात पुढे करत आहेत. झाडे लावण्यासाठी खड्डे आमच्याकडे आहेत. आपण फक्त या आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासोबतच आई जगदंबेचा परिसर हिरवागार करण्यासाठी झाडे लावा, असे आवाहन भोगाव देवी पर्यटनस्थळ समितीच्यावतीने करण्यात येत आहे. 

महिलांनी खारीचा वाटा उचलला 
आम्ही देवीच्या दर्शनासाठी तर येथे नेहमीच येऊन जातो. परत जाताना येथील पर्यटनस्थळावरील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पाहून आपणही देवी जगदंबेचा परिसर हिरवागार होण्यात खारीचा वाटा उचलावा अशी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. ती आता बचत गटांच्या माध्यमातून पूर्ण झाली. - अनुसया देशमुख, सिद्धीविनायक बचत गट, भोगाव देवी. 

संपादन ः राजन मंगरुळकर