
धाराशिव : जालना जिल्ह्यातील पोखरी (ता. भोकरदन) येथील एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील अभिषेक घुले याने नीटमध्ये ५५५ इतका स्कोअर घेत ९ हजार ९७७ वी रॅंक मिळविली आहे. गरजू विद्यार्थ्यांकडून मोफत एमबीबीएसची तयारी करून घेणाऱ्या पुण्यातील लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (एलएफयू) या संस्थेमुळे हे शक्य झाले आहे. मला जसा आधार आणि प्रशिक्षण मिळाले, तसेच प्रशिक्षण आता मी संस्थेतील इतर गरीब विद्यार्थ्यांना देणार आहे, असा निश्चय अभिषेकने व्यक्त केला आहे.