माजलगाव : डाके पिंपरी येथे दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करणारे लक्ष्मणराव डाके यांचा मुलगा राधाकिसन डाके याने एमबीबीएस, एमडी पदवी घेऊन डॉक्टर बनला. मुलगा डॉक्टर होण्याचे आई-वडिलांचे स्वप्न त्याने पूर्ण केले..आजच्या डिजिटल युगामध्ये पालक मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, याकरिता लाखो रुपये व वेळ खर्च करताना पाहतो. परंतु, घरची परिस्थिती बेताची, वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी, आईचे शिक्षणही जेमतेम; परंतु मुलगा राधाकिसन हा लहानपणापासूनच हुशार. त्याचे प्राथमिक शिक्षण डाके पिंपरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण उमरी येथील रामेश्वर विद्यालयामध्ये झाले..अकरावी-बारावीचे शिक्षण खोलेश्वर विद्यालय, अंबाजोगाई येथे केले. यानंतर नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळाला. परंतु, घरची परिस्थिती हालाखीची असल्याने शैक्षणिक कर्ज घेतले..आमदार प्रकाश सोळंके यांनी मदतीचा हात दिला. जिद्दीने व कठोर परिश्रम घेत राधाकिसनने एमबीबीएस पदवी मिळविली. एवढ्यावरच न थांबता लातूर येथील शासकीय महाविद्यालयातून एमडी पदवी मिळविली. यानंतर गडचिरोली येथे सहा महिने वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली..यानंतर मुंबई येथे जे जे हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून काम केले. यानंतर अहमदाबाद येथील डीजे वैद्यकीय महाविद्यालयातून डीएम कार्डिओलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. डॉ. राधाकिसन यांनी एवढे उच्च शिक्षण घेतल्यानंतर महानगरामध्ये वैद्यकीय सेवा न करता आपल्या मातीतील लोकांसाठी वैद्यकीय सेवा देण्यास जून-२०२४ पासून सुरवात केली. माजलगावमध्ये कॅथलॅब सुरू केले असून, आतापर्यंत सहा हजारपेक्षा अधिक रुग्णांची अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी केली..निदान व उपचार एका छताखाली माजलगावसारख्या ग्रामीण भागात मिळत असल्याने रुग्णांना दिलासा मिळत असून, आई-वडिलांची स्वप्नपूर्ती झाली. डॉ. राधाकिसन यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी भूलतज्ज्ञ डॉ. प्रियंका डाके यादेखील वैद्यकीय सेवा देत आहेत..Krishna Andhale : कृष्णा आंधळे नाशिकमध्ये नाहीच.विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रम व मेहनत घेतली पाहिजे. जिद्द ठेवल्यास यशप्राप्ती निश्चितच मिळते. शिक्षणासाठी पैसा अडसर कधीच ठरत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील स्पर्धेच्या युगामध्ये मागे नाहीत.— डॉ. राधाकिसन डाके.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.