esakal | विजेचा शॉक लागून शेतकरी मुलाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

A farmers son has died in Sengaon taluka due to a power outage 2.jpg

वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध हत्ता परिसरातील अनेकांच्या तक्रारी आहेत. परंतु वरिष्ठाकडून अद्याप कुठलीही दखल मात्र घेतली गेलेली नाही. यामुळेच शेतकऱ्यांच्या मुलाला नाहक आपला जीव गमवावा लागला.

विजेचा शॉक लागून शेतकरी मुलाचा मृत्यू

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

सेनगाव (हिंगोली) : तालुक्यातील हत्ता नाईक येथील देवानंद चक्के वय (१८) हा युवक गुरूवारी (ता. १९) दुपारी साडेबारा वाजता वडिलांचा जेवणाचा डबा घेऊन शेतामध्ये जात असताना वाटेतच विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

सेनगाव तालुक्यातील हत्ता (ना.) गावातील शेतकरी जनार्दन चेके आपल्या शेतातील पिकाला पाणी देत  होते. त्यांचा मुलगा देवानंद चेके हा दुपारी जेवणाचा डबा घेऊन शेतामध्ये जात होता. परंतु वाटेतच डिपीमधून वीजप्रवाह असलेले तार तूटून पडलेल्या तारेवर पाय पडला आणि त्या तारेला पायाचा स्पर्श झाल्यामुळे देवानंद चेके या तरुणाला विजेचा जब्बर धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 

त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध हत्ता परिसरातील अनेकांच्या तक्रारी आहेत. परंतु वरिष्ठाकडून अद्याप कुठलीही दखल मात्र घेतली गेलेली नाही. यामुळेच शेतकऱ्यांच्या मुलाला नाहक आपला जीव गमवावा लागला. ग्रामस्थांकडून वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. पुढील पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.


 

loading image
go to top