दावरवाडी येथे शेतकऱ्याची आत्महत्या 

दिगंबर सोनवणे
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

विषारी औषध घेतल्याचे लक्षात येताच सातपुते यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने आसपासचे ग्रामस्थ धावून आले. त्यांनी सातपुते यांना पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दावरवाडी : दावरवाडी (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातील घरात रविवारी (ता. 17) सकाळी साडेअकराच्या दरम्यान आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे भानुदास गणपत सातपुते (वय 68) असे नाव आहे.

विषारी औषध घेतल्याचे लक्षात येताच सातपुते यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने आसपासचे ग्रामस्थ धावून आले. त्यांनी सातपुते यांना पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावे कोरडवाहू जमिनीचे एकुण (61) आर एवढे क्षेत्रफळ आहे. त्यांच्यावर सेवा संस्थेचे पीक कर्ज होते. सततच्या नापिकीला व झालेले कर्ज कसे फेडायचे या विचारात ते असायचे. आपला उदरनिर्वाह कसा होईल असे ते पत्नीला सतत म्हणत असे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गोरक्ष खरड व जमादार सुधाकर मोहिते करित आहेत.

Web Title: Farmers Suicide in Davarwadi