Pachod News : शेतीसाठी जायकवाडीचे पाणी घेण्यास मज्जाव केल्याने शेतकरी आक्रमक; डाव्या कालव्यावरील घटना

'धरण आमच्या तालुक्यात बांधले, जमिनी आमच्या गेल्या, विस्थापनाचे चटके आम्ही सोसले; मग आमच्याच शेतीसाठी पाणी घेताना अडवणूक का?' असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
Farmers turn aggressive for jayakwadi water

Farmers turn aggressive for jayakwadi water

sakal

Updated on: 

पाचोड - मराठवाड्यातील सर्वांत मोठे मातीचे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाण्यावर परजिल्ह्यांतील शेती आणि कारखानदारी बहरली, मात्र ज्या तालुक्यात हे धरण उभारले गेले, त्याच तालुक्यातील शेतकऱ्याना विविध निकष लावून पाणी घेण्यापासून मज्जाव करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या पथकाला शेतकऱ्यानी घेराव घालत त्यांची कानउघडणी करून आंदोलन उभारण्याचा शनिवारी (ता. १४) दूपारी इशारा दिला.

Loading content, please wait...