Dharashiv Accidentsakal
मराठवाडा
Dharashiv Accident: देवदर्शनासाठी जाणाऱ्या दोन भाविकांचा मृत्यू; चालकाचे नियंत्रण सुटून पारगावजवळ अपघात,दोघे जखमी, दोन्ही मृत
Accident News: वाशी (धाराशिव) येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर एक्सयूव्ही गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला.
वाशी (जि. धाराशिव) : भरधाव एक्सयूव्ही वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. १९) मध्यरात्री सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर पारगावजवळ (ता. वाशी) घडली. ऋषिकेश सुदाम औताडे (वय २५, रा. हर्सूल, ता. छत्रपती संभाजीनगर) आणि अजिंक्य अंबादास लेंभे (रा. सावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे आहेत.