Accident News : पिकअपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
Road Accident : नाचनवेल ते बाबरा रस्त्यावर रविवारी रात्री पिकअप व दुचाकीच्या अपघातात विठ्ठल घुले (३६) यांचा जागीच मृत्यू झाला असून, पिशोर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
नाचनवेल : नाचनवेल ते बाबरा रस्त्यावर रविवारी रात्री पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, पिशोर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विठ्ठल किसन घुले (वय ३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.