Latur Accident : कार-दुचाकीच्या अपघातात तरुण ठार; एक जण गंभीर जखमी, अंबाजोगाई रस्त्यावरील पहाटेची घटना
Accident News : लातूर शहरातील अंबाजोगाई रस्त्यावर रविवारी पहाटे दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात नहूष पाटील सास्तूरकर याचा मृत्यू झाला. त्याचा मित्र नरेंद्र जाधव गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लातूर : लातूर शहरातील अंबाजोगाई रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात नहूष पाटील सास्तूरकर (वय २३) या तरुणाचा रविवारी (ता. आठ) जागीच मृत्यू झाला.