Pachod News: हृदय पिळवटून टाकणारी घटना! चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बापानेच दोन पोटच्या मुलांना फेकले कालव्यात; परिसरात उडाली खळबळ

Shocking Incident Father Throws Two Children Into Canal: दोन चिमुकल्यांना चॉकलेटचे आमिष दाखवले अन् कालव्यात फेकले; वडिलांच्या कृत्याने परिसर हादरला
Shocking Canal Incident Father Allegedly Throws His Two Children Into Water on the Pretext of Offering Chocolates

Shocking Canal Incident Father Allegedly Throws His Two Children Into Water on the Pretext of Offering Chocolates

esakal

Updated on: 

-हबीबखान पठाण

पाचोड : ज्या पित्याच्या कुशीत मुलांनी सुरक्षिततेचा आधार शोधायचा, त्याच जन्मदात्या पित्याने काळजाचा तुकडा असलेल्या आपल्या दोन निष्पाप मुलांना चॉकलेट व वडापाव खाऊ घालण्याचे आमिष दाखवून जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकून दिल्याची माणुसकीला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना सोमवारी (ता. १६) रात्री सात वाजेच्या सुमारास नांदर (ता. पैठण) शिवारात घडली. श्याम रोडगे (वय : पाच वर्षे) आणि आर्यन रोडगे (वय : सात वर्षे) अशी या दुर्दैवी चिमुकल्या भावंडाची नावे आहेत. घटने घडल्यापासून दोन्ही बालकांचा शोध सुरू असून अद्याप त्यांचे मृतदेह आढळून आलेले नाहीत. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.

Loading content, please wait...