विजेची तार अंगावर पडून बाप लेकाचा मृत्यू

File photo
File photo

वसमत (जि. हिंगोली) : शहराजवळील कवठा रोड परिसरातील वीट भट्टी वर काम करीत असलेल्या बाप लेकाच्या अंगावर विजेची तार तुटून पडल्याने  शॉक लागून त्यांचा जागीच भाजून मृत्यू झाल्याची  घटना शनिवारी (सहा मार्च २०२१) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील बेटसावंगी या गावातील रामदास सोनटक्के हे आपल्या कुटुंबियांसह वसमत येथील वीटभट्टीवर कामगार म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे सोनटक्के कुटुंबीय वीट भट्टीचे काम करत होते. सकाळी साडेसातच्या सुमारास वीट भट्टी वरून गेलेली विद्युत तार स्पार्किंग होऊन तुटली. 

वीट भट्टीवर कामाच्या धुंदीत असताना रामदास किसन सोनटक्के (वय ५०) व पांडुरंग रामदास सोनटक्के (वय २४) या बापलेकाच्या अंगावर विजेची तार पडली.

या घटनेत  जोरदार विद्युत शॉक लागून बाप लेकांचा भाजून जागेवरच मृत्यू झाला.  घटनास्थळाच्या पंचनामा नंतर दोन्ही प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेवून हंबर्डा फोडला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर वीट भट्टी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड : शेवडीच्या शिवानंद वट्टमवार यांना वीज बिलात दोन लाख ३१ हजाराची सुट

चहामुळे वाचला मायलेकाचा मृत्यू

घटना घडण्यापूर्वी रामदास सोनटक्के यांची पत्नी व दुसरा मुलगा चहा पिण्यासाठी गेले होते. त्यामुळे या घटनेमध्ये हे दोघेही वाचल्याने चहा मुळे या मायलेकाचा जीव वाचल्याची चर्चा बघ्यांमधून होत होती. कारण ही घटना घडण्यापूर्वी काही मिनिटांपूर्वीच मायलेक चहा पिण्यासाठी गेले होते. अन काही मिनिटातच ही दुर्दैवी घटना घडली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com