शिरूर कासार : तालुक्यातील झापेवाडी येथील पारधी समाजातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध जिवे मारणे, ॲट्रॉसिटी आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवगाव (ह.मु. झापेवाडी फाटा) येथील चाळीसवर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. दिलीप रामराव ढाकणे, महेश दिलीप ढाकणे, संदीप मिठू ढाकणे आणि राम उत्तम ढाकणे (सर्व रा. बावी) हे संबंधित महिलेच्या घरी आले. ‘तुमच्या शेतात मोठ्या प्रमाणावर रानडुकरांचा उपद्रव असून, त्यांना हुसकावून लावण्यासाठी किंवा पकडण्यासाठी मदत करावी’, असे त्यांनी महिलेला सांगितले..स्वतःची असमर्थता व पतीच्या अपंगत्वामुळे मदत करणे शक्य नसल्याचे तिने सांगितले. त्यावर संशयितांनी तिच्या कुटुंबाकडे डुक्कर पकडण्यासाठी लागणारा फास असून, तो घेऊन तिचा मुलगा व मुलीला शेतात पाठविण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने तिच्या मुलगा, मुलीला शेतात पाठविले..दुसऱ्या दिवशी महिला व तिचा पती फास पाहण्यासाठी शेतात गेले असता, संशयितांनी त्यांना अडवून शिवीगाळ केली. मुलीच्या अंगावर धावून जात तिचा विनयभंग केला. घाबरून आरडाओरड करत पळत असताना तोंड दाबून तिला शेतात पाडले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या भावालाही मारहाण करत धमक्या दिल्या आणि पलायन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी हनपुडे तपास करीत आहेत..Women Protest : डोक्यावर घागरी घेऊन महिलांचे आंदोलन.भोसलेविरोधात दिली होती तक्रारबावी येथे शेतकरी दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांना त्यांच्या शेतात वन्यजीव पकडण्यासाठी विरोध केल्याने झापेवाडी येथील सतीश भोसले यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी ढाकणे पिता-पुत्रांनी सतीश भोसले याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.