
लातूर : भारतीय संविधानाची माहिती प्रत्येक घरात पोचविण्याच्या उद्देशाने चालवण्यात येणाऱ्या ‘हर घर संविधान’ या मोहिमेत एक खास उपक्रम राबवण्यात येणार आहे. दयानंद कला महाविद्यालयातील प्रा. संदीपान जगदाळे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक अधिराज जगदाळे या पिता-पुत्राने शहरातील १ हजार घरांत संविधानाची उद्देशपत्रिका पोचविण्यास सुरवात केली आहे.