​Kannad News : मुंगसापूरच्या बापु महाराजाच्या आश्रमावर FDA चा छापा; बोगस औषधविक्री संशयावरून कारवाई,'महाराज' हिमालयात गेल्याचा मॅनेजरचा दावा

कन्नड तालुक्यातील मुंगसापूर येथील ब्रम्ह आश्रमावर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि आरोग्य विभागाने टाकला छापा.
Officials from the Food and Drug Administration conducting a raid on Bapu Maharaj's ashram in Mungsapur.

Officials from the Food and Drug Administration conducting a raid on Bapu Maharaj's ashram in Mungsapur.

sakal

Updated on

​कन्नड - कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना आणि औषध निर्मितीचा परवाना नसताना लोकांच्या जिवाशी खेळून बोगस औषधोपचार व विक्री केली जात असल्याच्या तक्रारीवरून कन्नड तालुक्यातील मुंगसापूर येथील ब्रम्ह आश्रमावर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि आरोग्य विभागाने संयुक्त छापा टाकला. मुंगसापूर (जेहुर) येथील 'ब्रह्मर्षी जनार्दन स्वामी आश्रम' या ठिकाणी बुधवारी (ता.२४) रोजी ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत रुग्णांचे नाव, आजार आणि घेतलेले शुल्क यांची नोंद असलेली ५ महत्त्वाची रजिस्टर जप्त करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com