गेवराई - गोदावरी नदीला पुरपरिस्थिती निर्माण होताच गेवराईच्या त्या ३२ गावास पुराचा वेढा पडतो. यामुळे या गावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. प्रशासन मात्र,सतर्कतेचा इशारा देऊन मोकळे होते.पुरपरिस्थितीचे संकट कमी होताच ग्रामस्थांना ही विसर पडुन जातो.प्रशासनाने ज्या गावास पुराचा वेढा पडतो अशा गावाचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे.