हिंगोलीत स्वच्छ सर्वेक्षणाबाबत फिडबॅक सुरु, नागरिकांना दिल्या पालिकेने टिप्स 

राजेश दारव्हेकर
Sunday, 20 December 2020

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये हिंगोली शहराला प्रतिक्रिया या घटकामध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. यावर्षी देखील स्वच्छ सर्वेक्षण २०२१ नागरिकांकडुन सहकार्या अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

हिंगोली : स्वच्छ सर्वेक्षणाचा देशपातळीवर प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. या बाबत नागरिकांना फोन काँलद्वारे फिडबॅक घेणे सुरू आहे. यात विचारण्यात येणाऱ्या प्रश्ना बाबतच्या टिप्स नगरपालिकेने दिल्या. त्या पाळण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी (ता. २०)  सायकल रँलीद्वारे जनजागृती करण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये हिंगोली शहराला प्रतिक्रिया या घटकामध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. यावर्षी देखील स्वच्छ सर्वेक्षण २०२१ नागरिकांकडुन सहकार्या अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षणा संदर्भात फोन काँलद्वारे फिडबँक घेणे सुरू झाले आहे. नागरिकांना काँल येत आहेत. काँल आल्यावर कोणते प्रश्न विचारण्यात येतील त्याची माहिती देण्यात आली असून विचारलेल्या प्रश्नांची उतरे द्यावीत अशी विनंती करण्यात आली आहे. 

हेही वाचा - चांगली बातमी : प्रवाशांच्या सोयीकरिता आणखी तीन विशेष गाड्या, दमरेचा निर्णय -

विचारले जाणाऱ्या प्रश्नात आपले शहर २०२१ मध्ये सहभागी झाले आहे काय त्याचे उतर होय, स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये शहराचा कोणता क्रमांक आहे. उतर अकरा, आपल्या परिसरातील स्वच्छतेला किती गुण द्याल उतर शंभर पैकी शंभर, व्यापारी व सार्वजनिक क्षेत्रातील स्वच्छतेबाबत किती गुण द्याल उतर शंभर पैकी शंभर, घंटागाडी मार्फत स्वच्छता कर्मचारी यांच्या द्वारे कचरा संकलन करताना ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देण्यास सांगतात का उतर होय, शहरातील सार्वजनिक शौचालया बाबत किती गुण द्याल शंभरपैकी शंभर, सार्वजनिक शौचालय गुगलवर सहज शोधु शकता का उतर होय, शहरातील स्वच्छतेबाबत तक्रारी अँपवर पाकता का उतर होय. अशी प्रश्नांची उत्तरे द्यावी असे आवाहन नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरुवाडे यांनी केले आहे. 

सायकल रँलीद्वारे जनजागृती

स्वच्छ सर्वेक्षणा संदर्भात रविवारी (ता. २०) सकाळी योग विद्याधाम ल नगर पालिकेतर्फे शहरातील मुख्य मार्गाने ही रँली काढण्यात यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरुवाडे व योग विद्याधामचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Feedback on clean survey started in Hingoli, tips given by the municipality to the citizens hingoli news