
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचा सत्कार
लातूर - शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस विभाग वेळोवेळी प्रयत्न करत आहे. मात्र वाहतुकीचे नियम आमच्यासाठी नाहीच अशा आवेशात वावरणाऱ्या काही नागरिकांनी नियम पाळायचे नाहीत असे ठरवले आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी केली. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पुष्हार घालून त्यांचा सत्कार केला जात आहे.
सण, उत्सवाचा व शेतीच्या मशागतीच्या कामाचा काळ असल्याने शहरातील रस्त्यावर गर्दी वाढली आहे. वाहनचालकास सोबतच जिल्ह्यातून सर्व दूरवरून येणारे नागरिक बाजारपेठ व मुख्य रस्त्याने गर्दी करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रयत्न सुरु आहेत.
पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या सूचनेवरुनशहरातील मुख्य चौकांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून गर्दीच्या ठिकाणी मुख्य चौका-चौकात वाहतूक शाखेचे पोलिस पायी गस्त घालत आहेत. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे चालकाविरुद्ध कारवाई केली जात आहे. चालक परवाना, वाहनाची कागदपत्रे तपासली जात आहेत.
वाहन चालविण्याचा परवाना, मालकी हक्काचे कागदपत्रे सोबत बाळगणार नाहीत तसेच मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरणारे बुलेट चालक, चालू गाडीवर मोबाईलवर संभाषण करणाऱ्या चालकावर वाहतूक पोलिस कारवाई करीत आहेत. त्यात पोलिसांनी गांधीगिरी करीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा सत्कार केला.
Web Title: Felicitations Of Traffic Violators
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..