esakal | खताच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ, शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत

बोलून बातमी शोधा

Osmanabad Fertilizer News}

शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो तेव्हा बाजारात त्याचे भाव हमीभावापेक्षा कमी असतात. शासनाची हमीभावाने खरेदी करण्याची व्यवस्था नसते.

खताच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ, शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत
sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : खरीपाचा हंगाम येण्या अगोदरच खताच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. एका बॅगमागे जवळपास 250 रुपयाची घसघशीत वाढ केल्याने पुन्हा शेतकरी पुरता अडचणीत येणार आहे. खतांच्या किंमतीच्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. यंदाच्या खरीपात शेतीचा लागवड खर्चही वाढणार आहे. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या बाजुने घोषणा करणाऱ्या सरकारला एका महिन्यातच कंपन्यानी उत्तर दिले आहे. खरीप हंगाम येण्याचा अंदाज बांधून बरोबर त्या अगोदर कंपन्या खताच्या दरात काही अंशी वाढ करीत असतात.

लॉकडाऊनच्या अफवेने बाजारात तोबा गर्दी; जुना मोंढा, शहागंजमधील किराणा दुकाने फुल्ल

त्यावर सरकारचे नियंत्रण नसल्याने दर वाढविण्याचे नेमके कारणही स्पष्ट होत नाही. यंदा तर या कंपन्यांनी मर्यादा ओलांडली आहे. जवळपास अडीचशे रुपयांची वाढ खतामध्ये केली आहे. खताबरोबरच मजुरी, विद्युत खर्च यावरही वाढणारा खर्च लक्षात घेता उत्पन्न दुप्पट करण्याची पोकळ घोषणा हवेत विरणार हे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देताना कितीतरी प्रक्रिया अभ्यासगट यांची मते सरकारला विचारात घ्यावीशी वाटतात. मात्र त्याच्या कित्येक पटीने खताच्या दरामध्ये वाढ होत असताना सरकार त्यावर एकही शब्दही बोलु शकत नाही. हे कृषीप्रधान देशातल दुर्देवी चित्र पाहायला मिळत आहे. शेतमालाचे भाव आहे तसेच आहेत. वाढले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होतो, असा दरवर्षीचा अनुभव असतो.

शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो तेव्हा बाजारात त्याचे भाव हमीभावापेक्षा कमी असतात. शासनाची हमीभावाने खरेदी करण्याची व्यवस्था नसते. शेतकरी अधिक वेळ थांबू शकत नाही. एकीकडे शेतीवरील खर्चात वाढ होत आहे. म्हणजेच उत्पादन खर्च वाढत आहे. भाव ‘जैसे थे’ असल्याने उत्पन्न दरवर्षी घटत आहे. शासन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायची भाषा करीत असताना वास्तव चित्र पाहिले तर शासनाचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होऊ लागल्या आहेत. खतांच्या दरवाढीवर शासनाने नियंत्रण आणावे, अशी मागणी शेतकऱ्यांतुन होऊ लागली आहे.

1500 

खताचे नाव       वाढलेले दर    अगोदरचे दर
डीएपी       1500    1255
10-26-26   1400 1225
12-32-16   1410   1235  
20-20-0-13     935
19-19-19   1500 1285
24-24-0     1500    1330

संपादन - गणेश पिटेकर