
"Festival Anthem Alert: 'Chikmotyachi Maal' Takes Over Ganesh Utsav!"
Sakal
गेवराई : गणरायाच्या आगमनाने संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह, आनंद आणि भक्तिभावाचे वातावरण गेले दहा दिवस पाहण्यास मिळत आले. ढोल-ताशांच्या गजरात, आरत्या-भजनांच्या स्वरांत आणि सजवलेल्या मंडपांमध्ये गणेशभक्त रंगून गेले जात होते. मात्र, यंदा गणेशोत्सवात एक गाणं सर्वत्र गाजतंय— ‘चिकमोत्याची माळ’. हे गाणं तरुणाईच्या जिभेवरच नाही तर सोशल मीडियावरही अक्षरशः राज्य करतंय. इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर या गाण्यावर आधारित शेकडो रील्स दररोज अपलोड होत असून, काही मिनिटांतच हजारों व्ह्यूज(लाईक) मिळत आहेत.