अबब... एकाच बिळात पंधरा नाग

संतोष जोशी
गुरुवार, 5 जुलै 2018

ग्रामीण भागात एक - दोन साप दिसले तर फारसे गांभिर्याने घेतलं  जात नाही. मात्र, एकाच घरातून आणि एकाच बिळातून... एका पाठोपाठ पंधरा विषारी नाग, नागिन आणि त्यांचे पिल्ले निघाले तर अनेकांची पाचावर धारण बसते.

हदगाव (नांदेड) - ग्रामीण भागात एक - दोन साप दिसले तर फारसे गांभिर्याने घेतलं  जात नाही. मात्र, एकाच घरातून आणि एकाच बिळातून... एका पाठोपाठ पंधरा विषारी नाग, नागिन आणि त्यांचे पिल्ले निघाले तर अनेकांची पाचावर धारण बसते.

असाच प्रकार नांदेड जिल्ह्य़ातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे घडला आहे. मनाठा येथील सरपंच रक्षा नरवाडे यांच्या घरात काल दुपारी तब्बल पंधरा नाग निघाले. अगोदर नाग, नंतर नागा पाठोपाठ नागिन आणि नागाचे पिल्ले बाहेर येऊ लागले. आवाज ऐकुन नागाची ही पिल्ले घरात जिकडे सैरावैरा सरपटू लागली. त्यामुळे नरवाडे यांचे कुटूंबिय घाबरले होते.

सरपंचाच्या घरात नाग निघाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि अनेकांनी सरपंच नरवाडे यांच्या घरी धाव घेत एकच गर्दी केली. गावात प्राणिमित्र नसल्याने आणि नाग विषारी जातीचा असल्याने नागरीकांनी घरात पसरलेल्या नागासहं सर्व पंधरा पिल्लांना मारुन टाकले. एकाच बिळातून विषारी नाग आणि त्याचे पिल्ले निघाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: fifteen snake in a single hole