Vidhan Sabha 2019 : परभणीत शिवसेना विरूद्ध काँग्रेस लढत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

परभणी विधानसभा मतदार संघातून अखेर काँग्रेसने रविराज देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुरेश नागरे यांनी उमेदवारी साठी फार जोर लाववला होता पण शेवटी त्यांना अपयश आले आहे.

परभणी : परभणी विधानसभा मतदार संघातून अखेर काँग्रेसने रविराज देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुरेश नागरे यांनी उमेदवारी साठी फार जोर लाववला होता पण शेवटी त्यांना अपयश आले आहे.

परभणी विधानसभा मतदार संघातून काँग्रेस तर्फे सुरेश नागरे यांना उमेदवारी मिळणार असे सांगितले जात होते. परंतु बुधवारी रात्री यावर पक्षा च्या नेत्यानी यावर विचार करून रात्री उशिरा रविराज देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली. काँग्रेश च्या तिसऱ्या यादीत रविराज यांचे नाव आले आहे. आता या मतदारसंघात आता  शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांची आता काँग्रेस चे रविराज देशमुख यांच्याशी सरळ लढत होईल. रविराज देशमुख हे माजी खासदार (कै.) अशोकराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fight between congress and shivsena in Parbhani for Maharashtra vidhansabha 2019