

निलंगा - निलंगा तालुक्यातील कासार शिरसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तांबळा, ता. निलंगा येथील 'ब्रिकयार्ड कार्ड क्लब'वर सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंदूक आणि तलवारीनिशी आलेल्या टोळीने क्लबमध्ये धुमाकूळ घालत एकावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपींनी पोलिसांच्या गाडीला धडक देऊन फिल्मी स्टाईलने हुलकावणी दिली. पोलिसांनी पाठलाग करून एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.