
छत्रपती सभाजीनगर : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत पॉलिटेक्निकच्या प्रवेशप्रक्रियेतील अंतिम गुणवत्ता यादी सोमवारी (ता. सात) जाहीर झाली. त्यामुळे पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी मंगळवार (ता. आठ) ते गुरुवार (ता. दहा) मुदत देण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज निवडू, शाखा कोणती निवडू, या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.