मागील एक वर्षापूर्वी सदर फायनान्सचे हिशोबामध्ये तफावत आल्यामुळे रामजानकी फायनान्स संचालक मंडळाचे अध्यक्षाने त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मयत संतोष यांच्या पत्नीने केला आहे.
निलंगा : फायनान्समध्ये झालेल्या घोटाळ्यास (Finance Scams) तूच जबाबदार आहेस, एकट्याने तू पैशांची व्यवस्था कर आणि ठेवीदारांचे पैसे परत कर, असा तगादा लावल्यामुळे फायनान्सचे व्यवस्थापक संतोष बाबूराव सुरवसे (वय ५०, रा. निलंगा) यांनी आडात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी (ता. १२ उघडकीस आला आहे.