वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील ज्ञानेश्वर नरहरी हिवाळे यांचे जिल्हा परिषद शाळेजवळील न्यू श्रीरामनगरात तीन मजली घर आहे. तळघरात गोडाऊन, त्यावर दुकान व सर्वातवर हिवाळे कुटुंब राहतात.
वाळूजमहानगर : वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथे माऊली इंटरप्राइजेस या किराणा दुकानाच्या गोडाऊनला (Mauli Enterprises Fire) बुधवारी (ता.12) रात्री 12 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.