
हिंगोली : शहरातील रेल्वेस्थानकाजवळ मॉकड्रिलसाठी वापरलेल्या रेल्वेच्या दोन डब्यांना बुधवारी (ता. सहा) सकाळी आग लागल्याची घटना घडली. तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित वा मोठी वित्तहानी झाली नाही, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.