Georai Accident : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील धावत्या ट्रकला आग, गेवराईच्या पांढरवाडी शिवारातील घटना
Dhule Solapur Highway : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराईच्या पांढरवाडी शिवारात चेन्नईकडे टपाल पार्सल घेऊन जात असलेल्या धावत्या ट्रकला अचानक आग लागली.
गेवराई : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून धुळ्याहून चेन्नईला टपाल पार्सल घेऊन चाललेल्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना काल बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गेवराईतील पांढरवाडी शिवारात घडली.