
आडुळ : प्लायवूड चा दरवाजा तयार करणाऱ्या पांढरी - पिंपळगाव (ता. छत्रपती संभाजीनगर ) येथील आर के इंडस्ट्रीज या कंपनी ला सोमवारी (ता. १७ ) रोजी पहाटे आडीच वाजेच्या सुमारास भिषण आग लागली यात कंपनीचा शेड सह तयार करून ठेवलेले दरवाजे, साहित्यासह कंपनीतील विविध मशिनरी जळून खाक झाली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी या कंपनीत कामाला असलेले परप्रांतीय कामगार कंपनीतच असलेल्या सदनिकेत झोपलेले होते. सुदैवाने त्यांना जाग आल्याने त्यांनी तेथुन पळ काढला व घटनेची माहिती कंपनीच्या मालकाला दिली.