Beed News: रुग्ण होरपळण्याची वाट कशासाठी पाहता?; जिल्ह्यातील १९ दवाखान्यांत नाही अग्निप्रतिबंधक यंत्रणा; तातडीने कार्यवाहीची गरज

Lack of Fire Safety in Beed Hospitals: बीड जिल्ह्यातील १९ सरकारी रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा नाही; रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने कार्यवाही आवश्यक.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: सरकारी दवाखान्यात आपला रुग्ण बरा होईल या आशेने आपण त्याला दाखल करतो. पण, जर त्याच दवाखान्यात अचानक आग लागली आणि बाहेर पडण्याचे मार्गच बंद असले तर? हे केवळ कल्पनेतले भय नाही, तर बीड जिल्ह्यातील १९ प्रमुख शासकीय रुग्णालयांची हीच भीषण वस्तुस्थिती आहे. रुग्णांचे प्राण वाचविण्याची जबाबदारी असलेल्या या पांढऱ्या भिंती आज स्वतःच मृत्युचा सापळा बनून उभ्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयासह तब्बल १९ संस्थांचे फायर सेफ्टी ऑडिट होऊन चार वर्षे उलटली, तरीही तिथे अग्नी प्रतिबंधक यंत्रणेची काहीच प्रक्रिया झालेली नाही. आता प्रश्न असा उरतो की, बीडमध्येही एखादे भीषण अग्नितांडव होऊन रुग्ण होरपळल्यानंतरच सरकारला जाग येणार का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com