
वसमत ( जिल्हा हिंगोली ) : येथील महिला रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या गवताला मंगळवारी (ता. ३०) दुपारी अचानक आग लागली. परंतु ही आग रुग्णालयापर्यंत पोहोचण्याआधी अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत माहिती अशी की परभणी रोडवर शासकीय महिला रुग्णालय आहे. विशेष म्हणजे कोणाचा संसर्ग सुरु झाल्यापासून उपजिल्हा रुग्णालयातील ओपिडी सुद्धा महिला रुग्णालयातच सुरु आहे. त्यामुळे महिला रुग्ण बरोबरच इतरही रुग्णवर महिला रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालय परिसरात पाठीमागे व आजूबाजूला मोठे गवत वाढलेले आहे. सध्या उन्हाळा परिस्थिती असल्याने सदरील गवते वाळले आहे. मंगळवारी (ता. 30) रोजी दुपारच्या वेळी अचानक या वाळलेल्या गवताला आग लागली. ही आग रौद्ररुप धारण करीत असतानाच व रुग्णालयापर्यंत पोहोचण्याआधी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन दल विभाग प्रमुखाशी संपर्क साधून आगीची माहिती दिली.
यावेळी अग्निशमन दलाची गाडी अवघ्या काही मिनिटांमध्ये महिला रुग्णालय परिसरात आल्यानंतर पथकाने आग आटोक्यात आणण्यासाठी कमालीचे प्रयत्न केले. सदरील रुग्णालयापर्यंत पोहोचण्याआधी डोक्यामध्ये आणल्याने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही किंवा पुढील अनर्थ टाळता आला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. नगरपरिषदेचे अधिकारी आशुतोष चिंचाळकर, विभाग प्रमुख प्रकाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन गाडीचे चालक राजेश जोगदंड, फायरमन कोल्हे गंगाधर जोगदंड, फायरमन गोरख भुजवणे, चालक असत यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.