Illegal Sand Mining sakal
मराठवाडा
Illegal Sand Mining : शहागड येथील अवैध वाळूची कारवाई गोत्यात; तो गोळीबार गेवराईच्या हद्दीत?
Jalna News : शहागड येथील अवैध वाळू कारवाईवेळी अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी हवेत गोळीबार केला. मात्र तो गोळीबार बीड जिल्ह्यातील गेवराई हद्दीत झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
जालना : अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई दरम्यान अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी हवेत चारवेळा गोळीबार केला. परंतु, कारवाई दरम्यान झालेला गोळीबार हा गेवराई (जि. बीड) हद्दीत झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर कारवाई शहागडच्या हद्दीत केल्याचा दावा तहसीलदार चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे ही कारवाई हद्दवादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.