कारमधून ऑफीसला जाताना झाला गोळीबार, सातवा आरोपी अटकेत (वाचा सविस्तर) 

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

नांदेड येथील गोविंद कोकूलवार हे 17 ऑगष्ट रोजी कारमधून उतरुन ऑफीसमध्ये जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात आजवर सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणातील आता सातवा आरोपी पोलिसांच्या हाती लागला असून त्याला मोक्काचे विशेष न्यायाधीश ए. डी. साळूंखे यांनी चार जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

औरंगाबाद : नांदेड येथील विनकर कॉलनीत गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळी झाडणाऱ्याला नांदेड पोलिसांनी अटक केली. त्याला गुरुवारी (ता. 26) मोक्काचे विशेष न्यायाधीश ए. डी. साळूंखे यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने चार जानेवारीपर्यत मोक्काची कोठडी सुनावली. वीरेंद्र ऊर्फ सतीश भंडारी संशयिताचे नाव आहे. 

हेही वाचा-Video : असा गेला सहा जणांचा जीव, एक दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात

नांदेड येथील विनकर कॉलनीत राहणारे 17 ऑगस्टला गोविंद कोकुलवार हे कारमधून उतरून कार्यालयात जाताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. कोकुलवार हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या घटनेची माहिती मिळताच इतवार पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमी कोकुलवार यांना उपाचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोकुलवार यांच्या तक्रारीवरून इतवार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

क्लिक करा-युरोपची कंपनी करतेय थेट बांधावरून कारले खरेदी

अद्यापपर्यंत सहा जण अटकेत 
पोलिसांनी तपास करून आतापर्यंत सहा जणांना अटक केली. दरम्यान, हा गुन्हा संघटीत केला असल्याचे तपासातून समोर आल्यामुळे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 या कलमान्वये गुन्हा नोंदवून पोलिस उपअधीक्षक धनजंय पाटील यांनी या गुन्ह्यातील सहावा संशयित वीरेंद्र ऊर्फ सतीष सोपनाराव कानोजी ऊर्फ भंडारी याला बुधवारी (ता.25) अटक केली. त्याला गुरुवारी मोक्काच्या विशेष न्यायालयात हजर केले असता मोक्काचे विशेष वकील राजू पहाडिया यांनी धमकी देणारा मोबाईलची माहिती वीरेंद्र ऊर्फ सतीशला होती. वीरेंद्रच्या ताब्यातून सात मोबाईल, लॉपटॉप आणि वादग्रस्त मालमत्तेच कागदपत्र हस्तगत करण्यात आले आहेत. 

हे वाचलंत का?- धड होते रेल्वेपटरीवर, शिर मात्र गायब! (वाचा कुठले प्रकरण)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: firing in Nanded: one accussed