
टोळीने गुन्हे करणाऱ्या पाच आरोपीतांना दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
हिंगोली : टोळीने गुन्हे करणाऱ्या पाच आरोपीतांना दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असुन ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शुक्रवारी (ता. २१) केली आहे. तसेच संबंधित पोलिस ठाण्यास आदेश देखील दिले आहेत.
वसमत शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावातील टोळीप्रमुख रेशमसिंग चव्हाण व सदस्य रणजितसिंग चव्हाण, किरणसिंग चव्हाण, जोगिंदरसिंग चव्हाण, नानकसिंग उर्फ राजुसिंग चव्हाण सर्व रा. शिक्कलकरी वस्ती, रेल्वेस्टेशन रोड वसमत यांना हिंगोली जिल्ह्याचे हद्दीबाहेर काढून देण्याचे आदेश पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलमप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्या बाबतचे आदेश निर्गमीत केले आहेत. सदरची कारवाई करण्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, विलास सोनवणे यांनी कामकाज केले आहे.
हेही वाचा - जागतिक हस्ताक्षर दिन विशेष : विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षरासाठी पांडुरंग चोपडे यांची धडपड?
दरम्यान ता. ३० डिसेंबर रोजी वसमत शहर व हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ११ आरोपीतांना हिंगोली जिल्ह्याबाहेर दोन वर्षासाठी हद्दपारीचे आदेश निर्गमीत केले आहेत. यापुढेही हिंगोली जिल्ह्यात असे टोळीने गुन्हे करणारे जास्तीत जास्त गुन्हेगारांविरुध्द जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सांगीतले आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे