Soybean Farm Fire
sakal
लोहारा (जि. धाराशिव) - दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन करून कष्टाने जगवलेल्या सोयाबीन पिकावर अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील वडगाववाडी येथे बुधवारी (ता. २१) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. पाच एकरांतील सोयाबीन काढून रास करण्यासाठी उभारलेली गंजी आगीत जळून खाक झाली. या घटनेमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.