नांदेड : पोहण्यासाठी गेलेल्या दाेघांचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील बामणी येथे पोहण्यासाठी गेलेले पाच जण तलावात बुडाल्याची घटना काल दुपारी चारच्या सुमारास घडली. 

नांदेड : जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील बामणी येथे पोहण्यासाठी गेलेले पाच जण तलावात बुडाल्याची घटना काल दुपारी चारच्या सुमारास घडली. यामध्ये दाेघांचा मृत्यू झाला तर इतर तिघांना वाचविण्यात यश आले आहे. 16 वर्षीय दिपक मुंंगल आणि 15 वर्षाचा गजानन कदम अशी दोन मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

मुलं बुडाल्याची माहिती मिळताच तलावात उडी घेऊन गजानन मुंगल या तरुणाने बुडालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. गजाननला तिन मुलांना वाचविण्यात यश आले मात्र, दोघांचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The five boys who went swimming are drowned; Success in rescuing three

टॅग्स