
माजलगाव : ऑटोरिक्षा आणि टेंपोच्या समोरासमोर झालेल्या अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना रविवारी (ता. एक) रात्री पावणेबाराच्या सुमारास नित्रुडजवळील पेट्रोल पंपाजवळ घडली, तर याच रस्त्यावर झालेल्या दुसऱ्या अपघातात ट्रकने एका दुचाकीस्वाराला चिरडले. या दोन्ही घटना खामगाव-पंढरपूर महामार्गावर माजलगाव ते तेलगावदरम्यान घडल्या.