लोहारा (जि. धाराशिव) - खुनाच्या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी तब्बल पाच लाखांची लाच मागणाऱ्या पोलिसांवर अखेर कारवाई करण्यात आली आहे. लाच प्रकरणात गुंतलेल्या प्रभारी पोलिस अधिकाऱ्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांना धाराशिव जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी गुरुवारी (ता. १३) निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे पोलिस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.