मांगनी नदीला पूर, जालना जिल्ह्यातील पाच गावांचा संपर्क तुटला

वडीगोद्री (जि.जालना) - वडीगोद्री-नालेवाडी  रस्त्यावरील मांगनी नदीला पूर आला आहे. (छायाचित्र - दिलीप दखने)
वडीगोद्री (जि.जालना) - वडीगोद्री-नालेवाडी रस्त्यावरील मांगनी नदीला पूर आला आहे. (छायाचित्र - दिलीप दखने)

वडीगोद्री (जि.जालना) - वडीगोद्री (Vadigodri) विभागात अंतरवाली सराटी, नालेवाडी आदी ठिकाणी मंगळवार (ता.३१) पहाटे दोन वाजेपासुन जोरदार पाऊस (Rain) झाल्याने शेतात पाणी साचले आहे. नालेवाडी येथील मांगनी नदी , अंतरवाली सराटी येथील सुखी नाला, लेंडी नाला येथे पाणी आले आहे. भागात रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. मांगनी नदीला पाणी आल्याने वडीगोद्री ते भांबेरी रस्त्यावर वाहतुक बंद झाली आहे. नालेवाडी, रेणापुरी, चंदनापुरी, दह्याळा, भांबेरी या गावांचा संपर्क तुटला आहे. वडीगोद्री येथून येणारे वाहने नालेवाडीपासून वापस जात आहे. अंतरवाली सराटी येथील सुखी नाल्याला पाणी (Jalna) आले असून नाला भरूच वाहत आहे.

जालन्यातील आठ मंडळात अतिवृष्टी, जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. धाकलगाव, शहापुर या ठिकाणी मंगळवार पहाटेपासून पाऊस पडत असल्याने शहापुर येथील गल्हाटी नदीला पाणी आले आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळें शेतात पाणी साचले आहे. सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com