Accident News : भरधाव ट्रॅव्हल्सखाली चिरडून पाचवर्षीय बालकाचा मृत्यू
Bus Accident : देगलूरमध्ये एका पाचवर्षीय मुलाचा भरधाव ट्रॅव्हल्सखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता नवीआबादी मेदनकल्लूर येथे घडली.
देगलूर : सगरोळीहून देगलूरकडे येणाऱ्या एका भरधाव खासगी ट्रॅव्हल्सखाली चिरडून एका पाचवर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसातला नवीआबादी मेदनकल्लूर येथे घडली.