Leopard Attack : पिंपळसुटीत बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; दोन तासांच्या शोधानंतर उसाच्या शेतात मृतदेह सापडला

बिबट्याने गोठ्यात झोपलेल्या पाच वर्षीय चिमुकलीला उचलून नेत ठार केल्याची हृदयद्रावक घटना घडली.
Bhagyashri Ware

Bhagyashri Ware

sakal

Updated on

- प्रमोल कुसेकर

आंधळगाव - शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथील फलकेमळा परिसरात बिबट्याने गोठ्यात झोपलेल्या पाच वर्षीय चिमुकलीला उचलून नेत ठार केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (ता. २२) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. भाग्यश्री संदीप वारे (वय-५) मूळ रा. करोडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर, सध्या रा. पिंपळसुटी, ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने पिंपळसुटीसह संपूर्ण शिरूर तालुका हादरला असून बिबट्यांच्या वाढत्या वावराबाबत वन विभागाच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com