तो पिशवी घेऊन रस्त्यावर थांबला होता, पोलिसांनी पकडले, अन्‌ झाली पाच वर्षे शिक्षा 

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

गांजा विक्री करण्यासाठी एक तरुण पिशवी घेऊन रस्त्यावर थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे  पोलिसांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास सापळा रचून पिशवी घेऊन थांबलेल्या तरुणास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करत त्याच्या जवळील पिशवीची झडती घेतली असता त्यात गांजा आढळून आला.
 

औरंगाबाद : शहरात सर्रासपणे गांजा विकरणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी दोषी ठरवून 5 वर्षे सक्तमजुरी, 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जावेद खान आयुब खान असे त्या आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा-भारतीय कापूस निगमला न्यायालयाने का बजावली नोटीस? (वाचा सविस्तर)

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना 7 ऑगस्ट 2017 रोजी नुतन कॉलनी परिसरातील अजबनगरात गांजा विक्री करण्यासाठी एक तरुण पिशवी घेऊन रस्त्यावर थांबला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सावंत यांच्या पथकाने रात्री आठ वाजेच्या सुमारास सापळा रचून पिशवी घेऊन थांबलेल्या तरुणास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करत त्याच्या जवळील पिशवीची झडती घेतली असता त्यात गांजा आढळून आला. अजबनगरात राहणारा जावेद खान अयुब खान (35, रा. अजबनगर, नुतनकॉलनी) याच्या ताब्यातून 2 किलो 182 ग्रॅम गांजा, मोबाईल, रोख 2 हजार 170 रुपये असा 11 हजार 682 रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस शिपाई सुधाकर राठोड यांच्या तक्रारीवरुन जावेद खान अयुब खान विरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

हे वाचलंत का?-तुमच्या घरी जायचे, ओळखपत्र दाखवा : सातारा तांड्याच्या नागरिकांची व्यथा

पाच वर्षे सक्‍तमजूरी 
सहायक पोलीस निरीक्षक अखमल शेख यांनी तपास करुन जावेदखान विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता बी. आर. लोया यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायलायाने जावेदखानला अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 20 ब, नुसार दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी, 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. 

क्लिक करा-बापरे... शासनाकडे "आरटीई'चे अकरा कोटी रूपये थकीत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five years jail for Cannabis sale