‘एसटी’च्या परभणी विभागाचे कोटींचे उड्डाण

भास्कर लांडे
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

परभणी : राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागास प्रवाशीरूपी लक्ष्मी पावल्याने यंदाच्या दिवाळीत तब्बल सहा कोटी नऊ लाख ४० हजारांचे उत्पन्न झाले. विशेषतः परभणी जिल्ह्यातील चारही आगाराचे भारमान ६० पुढे असल्याने हिंगोलीपेक्षा परभणी उत्पन्नात पुढे आहे.

परभणी : राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागास प्रवाशीरूपी लक्ष्मी पावल्याने यंदाच्या दिवाळीत तब्बल सहा कोटी नऊ लाख ४० हजारांचे उत्पन्न झाले. विशेषतः परभणी जिल्ह्यातील चारही आगाराचे भारमान ६० पुढे असल्याने हिंगोलीपेक्षा परभणी उत्पन्नात पुढे आहे.

२०१७  मध्ये एसटी कर्मचाऱ्यांची ऐन दिवाळीत संप पुकारल्याने उत्पन्नात विक्रमी घट झाली होती. ती कसर गतवर्षी देखील भरून काढता आली नाही. परंतु, यंदाचे साल परभणी विभागासाठी फायदेशीर ठरले. त्यात नियमीत बसेससह अतिरीक्त १०० बसेसचे नियोजन दिवाळीत होते. प्रामुख्याने परभणीतून पुणे, अमरावती, बीड, लातूरसह अन्य मार्गावर १६ हजार २५ हजार किलो मीटर बसेस धावल्या. सर्वच आगाराचे प्राधान्य पुण्याला होते. त्यासह जिंतूर आगाराने अमरावती, यवतमाळ अन्य ठिकाणी बसेस सोडल्याने दोन लाख २० हजार किलो मिटरचे अंतर पार केले. या प्रत्येक किमीला ३८.८६ रूपये उत्पन्न मिळाले. सर्वाधिक उत्पन्न आणि भारमानात परभणीने बाजी मारली. त्यांच्या बसेस दोन लाख ६९ हजार किलो मीटर धावल्याने एक कोटींच्यावर उत्पन्न गेले.

त्यानंतर गंगाखेड आगाराच्या बसेस जिंतूरपेक्षा सहा हजार किलो मीटर अधिक चालल्या. परंतु, प्रत्येक किलो मिटरला ३६.२७ रूपये मिळाल्याने एकूण उत्पन्न ८२ लाखांपर्यंत गेले. त्यांनी पूणे, लातूर, परभणी, नांदेड, सोनपेठ मार्गावर अधिक बस सोडल्या होत्या. पाथरीतून पूणे, लातूर, अकोला, औरंगाबाद, बार्शीसाठी गेलेल्या बसेसची संख्या अधिक होती. त्यांना किलो मिटरमागे मिळालेले ३७.९२ रूपये हे गंगाखेडपेक्षा अधिक आहेत. दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील सर्वच आगाराचे भारमान आणि प्रति किलो मीटरमागे मिळणारे उत्पन्न कमी आहे. त्यात कळमनुरी आगार फायदेशीर राहिले. कमी बसेस सोडल्या तरीही एक लाख ६८ हजार प्रवास झाला. भारमान ५९ वर होते. सर्वात कमी भारमान वसमत आगाराचे असून त्यांच्या बसेस दोन लाख ३६ हजार किलो मीटरपर्यंत धावल्या. दिवाळीसह शाळांना सुट्ट्या लाग्याने बसेसना प्रतिसाद वाढला. म्हणून दिवाळीचा हंगाम महामंडळाला फायदेशीर ठरला.

चौकट.
लवचिक भाडेवाढीने उत्पन्नात भर
राज्य परिवहन महामंडळाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही लवचिक भाडेवाढीच्या नावाखाली ऐन दिवाळीत १० टक्के भाढेवाढ केली. ती २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत होती. साधीसेवा, रातराणी आणि निमआराम सेवेसाठी परिवर्तनशील भाढेवाढ होती. त्यातून वर्षातील सर्वात मोठा हंगाम कॅश केला. त्यामुळे दिवाळीत  सर्वाधिक फायदा झाला. कोणत्याही बसने प्रवास केला तरी भाडेवाढीला सामोरे जावे लागत असल्याने त्यातून आगाराला अधिक उत्पन्न मिळाले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The flight of crores of Parbhani division of ST