Video : परभणी शहरावर धुक्याची चादर...

परभणी शहरावर शनिवारी सकाळी धुक्याची चादर पसरली होती.
परभणी शहरावर शनिवारी सकाळी धुक्याची चादर पसरली होती.
Updated on

परभणी : परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी (ता.चार) पहाटेपासून मोठ्या प्रमाणात धुके पसरले होते. धुके पसरण्याची ही यावर्षातील तिसरी घटना आहे. धुक्याचा आनंद घेण्यासाठी नागरीक सकाळपासूनच घराबाहेर पडले होते.

परभणी जिल्ह्यात पावसाळ्यात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावली होती. काही दिवसापूर्वी थंडीला सुरवात झालेली असतांनाच अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने याचा फटका पिकांना बसत आहे. बदललेल्या वातावरणामुळे नागरींकाच्या तब्येतीवर देखील वाईट परिणाम दिसून आला आहे. काही दिवसापूर्वी हिवाळ्याच्या सुरवातीला परभणी जिल्ह्यात धुक्याची चादर पसरली होती. त्यानंतर पुन्हा एका असाच प्रकार पहावयास मिळाला. शनिवारी परत एकदा परभणीकरांना धुक्याचा आनंद घेण्यात आला. 

वाहनांचा वेग मंदावला
पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांना धुक्याची खरी मजा लुटता आली. दाट धुके असल्यामुळे वाहनांना सावकाश जावे लागत होते. आठ वाजल्यानंतर थोड्यावेळासाठी सूर्यदर्शन झाले. मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात शनिवारी परभणीचे किमान तापमान १३ अंश सेल्सियस इतके निचांकी नोंदवण्यात आले आहे. तर कमाल तापमान ३० अंश आहे. परभणी येथील रेल्वे स्टेशन परिसरात व महामार्गावर थंडीमुळे सकाळी सात वाजता धुक्याची चादर पसरलेली दिसून येत होती. तसेच या थंडीचा फटका पहाटे दूध, पेपर, भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. ते उशिराने आपल्या कामांना सुरूवात करत होते.


आरोग्यावर परिणाम 
 महत्त्वाचे म्हणजे या थंडीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. सर्दी, खोकला, तापीचे रूग्ण वाढत आहेत. सर्व रूग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. विशेषतः डेंगी सदृश्य रुग्णांमध्ये अधिक वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने सर्वत्र डासांची निर्मिती झाली होती. त्यामुळे डेंगी सदृश्य आजार आणि तापीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरात धूर फवारणी व आरोग्य जनजागृती केली जात आहे.


 उबदार कपड्यांना मागणी
 जिल्ह्यात ढगाळ वातावरणासोबत थंडीचा कडाका वाढत चालला आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. ऑक्टोबर महिण्याच्या अखेरीस थंडी सुरु होण्याऐवजी नोव्हेंबर महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी सुरु झाली. त्यानंतर कडाका वाढलेला असतानाच डिसेंबर महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अधुन-मधुन ढगाळ वातावरण आणि मध्येच सुर्यप्रकाश अशा उनसावलीच्या खेळात थंडी गायब झाली होती. साधारण दोन आठवडे थंडी गायब झाली होती. थंडीमुळे जनजिवन विस्कळीत झाले असून पहाटे लवकर बाहेरगावी नोकरी, कामानिमित्त प्रवासाल जाणाऱ्यांचे हाल होत आहेत.थंडीमुळे उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. तसेच ग्रामीण भागात सकाळी आणि सायंकाळी शेकोट्या पेटत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MLA Kailas Patil's Demand Accepted; Government Assures Unconditional MGNREGA Subsidy
MLA Baburao Kadam Kohalikar demands retaining Hadgaon and Himayatnagar talukas under Nanded district instead of Kinwat
Private Money Lending License Bribe: Three Held in ACB Operation at Majalgaon
45-Day Spiritual Journey Begins: Sacred Bullock Pair to Lead Sant Eknath Maharaj’s Palkhi
Marathi News Esakal
www.esakal.com