गुरुद्वारा बोर्डातर्फे घरपोच लंगर सेवा

प्रल्हाद कांबळे
Saturday, 4 April 2020

शहरातील विविध भागातील नागरिकांना घरपोच लंगर (अन्न दान ) करण्यात येत आहे. रोज हजारों लोकांना या अन्नदानाचा लाभ मिळत आहे.

नांदेड : कोरोना व्हायरसविरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात गुरुद्वारा सचखंड बोर्ड संस्थेने पुढाकार घेतला आहे. मागील पाच दिवसांपासून शहरातील विविध भागातील नागरिकांना घरपोच लंगर (अन्न दान ) करण्यात येत आहे. रोज हजारों लोकांना या अन्नदानाचा लाभ मिळत आहे.

सचखंड गुरूद्वारा आणि लंगरसाहेबच्या वतीने नांदेडवर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी लंगरसेवा देण्यात येत असते. यापूर्वीही नांदेडमध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने शहराच्या अनेक भागात नागरी वसाहतीत पाणी शिरले होते. या नागरिकांना त्यांनी धीर देत तब्बल आठ दिवस लंगरची व्यवस्था केली होती. तसेच रस्त्यावर उभ्या राहिलेल्या ट्रक चालक व क्लिनरला रोज भाजन देण्यात येत होते. सचखंड गुरूद्वारा व लंगरसाहेब गुरूद्वाराच्या वतीने ही सेवा देण्यात येत आहे. 

हेही वाचा - टेम्पो चालक संघटनेने शासनाकडे केली ही मागणी...
लाॅकडाऊनमध्ये नांदेडकरांची सेवा 

 
नांदेड शहरात सध्या कलम १४४ सुरु आहे. लॉकडाउन परिस्थितीत शहर बंदमध्ये नागरिकांना खाण्या पिण्याच्या वस्तूंसाठी चांगलीच पंचायत होत आहे. अशावेळी गुरुद्वारा बोर्डाने नेहमी प्रमाणे मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून विविध लंगर तयार करून वाटप सुरु केले आहे.

सचखंड गुरूद्वाराचे सर्व पदाधिकारी

गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स.  भूपिंदर सिंघ मिनहास, उपाध्याय स. गुरविंदरसिंघ बावा यांच्या मार्गदर्शनात सचिव रविंदरसिंघ बुंगाई, व्यवस्थापन समिती सदस्य देवेंद्रसिंघ मोटरावाले, अवतारसिंघ पहरेदार, अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा, प्रशासकीय अधिकारी स. डी. पी. सिंघ (चावला), कनिष्ठ अधीक्षक रविंद्रसिंघ कपूर आणि इतर अधिकारी तसेच कर्मचारी लंगर सेवेसाठी परिश्रम घेत आहेत. लंगर तयार करण्यासाठी कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला असून पहाटे चार वाजता पासून जेवण तयार करण्याचे कार्य सुरु होत असून रात्री उशिरापर्यंत लंगर वाटप करण्यात येत आहे. 

येथे क्लिक कराचित्रकारांची पेटिंगमधून ‘कोरोना’ जनजागृती

सॅनिटाइजर वितरण

गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सध्या शीख समाजात सॅनिटाइजर साहित्याचे वितरण सुरु आहे. बोर्डाचे कर्मचारी घरोघरी सॅनिटाइज़रच्या बाटल्या वाटप करीत आहेत. या सेवेबद्दल नागरिकांनी ही समाधान व्यक्त केले आहे. 

फवारणी :  

गुरुद्वारा बोर्डातर्फे अबचलनगर कॉलनी, यात्री निवास रोड, बड़पुरा, शहीदपुरा, भगतसिंघ मार्ग येथे सॅनिटाइज़र आणि औषधींची फवारणी करण्यात येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: food service at home by the gurudwara board nanded news